Jump to content

अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक किंवा इंडियन अमेरिकन हे अमेरिकेचे नागरिक असलेले आणि भारतीय पूर्वज असलेल्या लोकांना दिलेले नाव आहे.

अमेरिकेत स्वतःला या गटात मोजणारे अंदाजे ३१,८०,०० व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येचा साधारण १% असलेला हा गट चीनी अमेरिकन आणि फिलिपिनो अमेरिकन यांच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकाचा मोठा वस्तीगट आहे. []

इतिहास

[संपादन]

अमेरिकेच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात भारतीयवंशी लोकांना अमेरिकेत येणे तसेच नागरिकत्व मिळणे दुरापास्त होते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात कायद्यानेच यावर बंदी घातलेली होती. इ.स. १९४६ च्या ल्यूस-सेलर कायद्याने भारतीयांना अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्यास परवानगी परत मिळाली.[] अमेरिकेत वास्तव्यास आलेल्या भारतीयवंशी लोकांपैकी मोठा भाग भारतेतर देशांतून आला. यांत युनायटेड किंग्डम, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर, सुरिनाम, गयाना, फिजी, केन्या, टांझानिया, युगांडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच जमैका या देशांचा समावेश होतो.

वस्तीविभागणी

[संपादन]

२०१० च्या जनगणनेनुसार[] अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची लोकसंख्या इ.स. २०००मध्ये १६,७८,७६५ (एकूण लोकसंख्येचा ०.६% भाग) होती तर २०१०मध्ये ती २८,४३,३९१ (०.९%) इतकी झाली.[][][]

जर्सी सिटी, न्यू जर्सीमधील इंडिया स्क्वेर. न्यू जर्सी राज्यात भारतीय वंशाच्या लोकांची दाट वस्ती आहे.[][][][१०]

न्यू यॉर्क महानगर तसेच आसपासच्या भागात ५,९२,८८८ भारतीय वंशाच्या व्यक्ती राहतात. यात न्यू यॉर्क शहर, लॉंग आयलंड, ट्रेंटन, न्यू जर्सी, ब्रिजपोर्ट, कनेटिकट, पाइक काउंटी, पेनसिल्व्हेनिया पर्यंतच्या भागांचा समावेश होतो.[११] अमेरिकेतील शहरांपैकी न्यू यॉर्क शहरात अशा व्यक्तींची लोकसंख्या २,०७,४१४ इतकी सर्वाधिक आहे.[११] भारतीय वंशाच्या व्यक्तींची मोठी संख्या असलेली शहरे अटलांटा, बाल्टिमोर-वॉशिंग्टन, बॉस्टन, शिकागो, डॅलस-फोर्ट वर्थ, डीट्रॉइट, ह्यूस्टन, लॉस एंजेलस, फिलाडेल्फिया, सान फ्रांसिस्को, सान होजे, ओकलंड, डेन्व्हर, इ. आहेत.

दशकानुसार लोकसंख्या

[संपादन]
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९१० २,५४५
इ.स. १९२० २,५०७ −१%
इ.स. १९३० ३,१३० +२४%
इ.स. १९४० २,४०५ −२३%
इ.स. १९८० ३,६१,५३१ +१४९३२%
इ.स. १९९० ८,१५,४४७ +१२५%
इ.स. २००० १६,७८,७६५ +१०५%
इ.स. २०१० २८,४३,३९१ +६९%

[१२]

नोंद: १९८०पूर्वीचे आकडे "हिंदूवंशीय" लोकांची संख्या दर्शविते.

अमेरिकेतील भारतीयवंशी व्यक्तींची मोठी संख्या असलेली शहरे

[संपादन]
अमेरिकेतील महानगरे
क्र. महानगर एकूण लोकसंख्या (२०१०) भारतीयवंशी व्यक्ती (२०१०) % भारतीयवंशी व्यक्ती आशियावंशी व्यक्ती (२०१०)[१३] % आशियावंशी व्यक्ती
न्यू यॉर्क, उत्तर न्यू जर्सी, लॉंग आयलंड 18,897,109 526,133 2.8 1,878,261 9.9
लॉस एंजेलस, लॉंग बीच, सांता ॲना, कॅलिफोर्निया 12,828,837 119,901 0.9 1,884,669 14.7
शिकागो, जोलियेट, नेपरव्हिल, इलिनॉय 9,461,105 171,901 1.8 532,801 5.6
डॅलस, फोर्ट वर्थ, आर्लिंग्टन, टेक्सास 6,371,773 100,386 1.6 341,503 5.4
फिलाडेल्फिया, कॅम्डेन, विल्मिंग्टन, डेलावेर 5,965,343 90,286 1.5 295,766 5.0
ह्यूस्टन, शुगरलॅंड, बेटाउन, टेक्सास 5,946,800 91,637 1.5 389,007 6.5
वॉशिंग्टन डी.सी., आर्लिंग्टन, व्हर्जिनिया, अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया 5,582,170 127,963 2.3 517,458 9.3
मायामी, फोर्ट लॉडरडेल, पॉंपानो बीच, फ्लोरिडा 5,564,635 41,334 0.7 125,564 2.3
बॉस्टन, कॅंब्रिज, क्विन्सी, मॅसेच्युसेट्स 4,552,402 62,598 1.4 294,503 6.5
१० सान फ्रांसिस्को, ओकलंड, फ्रीमॉंट, कॅलिफोर्निया 4,335,391 119,854 2.8 1,005,823 23.2
११ डीट्रॉइट, वॉरेन, लिवोनिया, मिशिगन 4,296,250 55,087 1.3 141,316 3.3
१२ रिव्हरसाइड, सान बर्नार्डिनो, ऑंटारियो, कॅलिफोर्निया 4,224,851 23,587 0.6 259,071 6.1
१३ फीनिक्स, ग्लेनडेल, मेसा, ॲरिझोना 4,192,887 31,203 0.7 138,717 3.3
१४ सिॲटल, टाकोमा, बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन 3,439,809 52,652 1.5 392,961 11.4
१५ मिनीयापोलिस, सेंट पॉल, ब्लूमिंग्टन, मिनेसोटा 3,279,833 29,453 0.9 188,018 5.7
१६ सान डियेगो, कार्ल्सबाड, कॅलिफोर्निया 3,095,313 24,306 0.8 336,091 10.0
१७ सेंट लुईस, मिसूरी 2,812,896 16,874 0.6 60,072 2.1
१८ टॅम्पा, सेंट पीटर्सबर्ग, क्लियरवॉटर, फ्लोरिडा 2,783,243 23,526 0.8 80,879 2.9
१९ बाल्टिमोर, मेरिलॅंड 2,710,489 32,193 1.2 122,911 4.5
२० डेन्व्हर, अरोरा, ब्रूमफील्ड, कॉलोराडो 2,543,482 13,649 0.5 94,005 3.7
२१ पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया 2,356,285 14,568 0.6 41,238 1.8
२२ पोर्टलॅंड, व्हॅनकूवर, हिल्सबोरो, ऑरेगन 2,226,009 15,117 0.7 126,965 5.7
२३ ओरलॅंडो, किसिमी, सॅनफोर्ड, फ्लोरिडा 2,134,411 26,105 1.2 84,852 5.0
२४ सिनसिनाटी, मिडलटाउन, ओहायो 2,130,151 14,696 0.7 40,422 1.9
२५ क्लीव्हलंड, ओहायो 2,077,240 14,215 0.7 40,522 2.0
२६ कॅन्सस सिटी, मिसूरी 2,035,334 11,646 0.6 46,221 2.3
२७ सान होजे, सनिव्हेल, सांता क्लारा, कॅलिफोर्निया 1,836,911 117,711 6.4 571,967 31.3
२८ इंडियानापोलिस, इंडियाना 1,756,241 12,669 0.7 39,576 2.3
२९ रिचमंड, व्हर्जिनिया 1,258,251 12,926 1.0 39,265 3.1
३० हार्टफोर्ड, कनेटिकट 1,212,381 18,764 1.5 47,339 3.9
३१ रॅले, ड्युरॅम, केरी, उत्तर कॅरोलिना 1,130,490 20,192 1.8 49,862 4.4
३२ फ्रेस्नो, कॅलिफोर्निया 930,450 15,469 1.7 89,357 9.6
३३ ब्रिजपोर्ट, स्टॅमफर्ड, नॉरवॉक, कनेटिकट 916,829 15,439 1.7 42,284 4.6
३४ स्टॉकटन, कॅलिफोर्निया 685,306 12,951 1.9 98,472 14.4
३५ फेटव्हिल, आर्कान्सा 422,610 3,534 0.9 12,948 3.06
३६ ट्रेंटन, युइंग, न्यू जर्सी 366,513 15,352 4.2 32,752 8.9

वरील आकडे स्वतःला पूर्णपणे भारतीयवंशी आणि पूर्णपणे आशियाईवंशी म्हणविणाऱ्या लोकांचे आहेत. यांत मिश्रवंशीय भारतीय तसेच मिश्रवंशीय आशियाई व्यक्तींचा समावेश नाही.

अमेरिकेतील राज्यानुसार भारतीयवंशी व्यक्तींची संख्या

[संपादन]
राज्य भारतीयवंशी व्यक्ती (२०००ची जनगणना) भारतीयवंशी व्यक्ती (२०००ची जनगणना)[१४] २०००-२०१० दरम्यान बदललेली टक्केवारी
कॅलिफोर्निया 360,392 528,176 46.6%
न्यू यॉर्क 296,056 313,620 5.9%
न्यू जर्सी 169,180 292,256 72.7%
टेक्सास 129,365 245,981 90.1%
इलिनॉय 124,723 188,328 51.0%
फ्लोरिडा 70,740 128,735 82.0%
व्हर्जिनिया 48,815 103,916 112.9%
पेनसिल्व्हेनिया 57,241 103,026 80.0%
जॉर्जिया 46,132 96,116 108.3%
मेरीलॅंड 49,909 79,051 58.4%
मॅसेच्युसेट्स 43,801 77,177 76.2%
मिशिगन 54,656 77,132 41.1%
ओहायो 38,752 64,187 65.6%
वॉशिंग्टन 23,992 61,124 154.8%
उत्तर कॅरोलिना 26,197 57,400 119.1%
कनेटिकट 23,662 46,415 96.2%
ॲरिझोना 14,741 36,047 144.5%
मिनेसोटा 16,887 33,031 95.6%
इंडियाना 14,865 27,598 85.7%
टेनेसी 12,835 23,900 86.2%
मिसूरी 12,169 23,223 90.8%
विस्कॉन्सिन 12,665 22,899 80.85
कॉलोराडो 11,720 20,369 73.8%
ओरेगन 9,575 16,740 74.8%
दक्षिण कॅरोलिना 8,856 15,941 80.0%
कॅन्सस 8,153 13,848 69.9%
अलाबामा 6,900 13,036 88.9%
केंटकी 6,771 12,501 84.6%
ओक्लाहोमा 8,502 11,906 40.0%
नेव्हाडा 5,535 11,671 110.9%
डेलावेर 5,280 11,424 116.4%
लुईझियाना 8,280 11,174 35.0%
आयोवा 5,641 11,081 96.4%
न्यू हॅंपशायर 3,873 8,268 113.5%
आर्कान्सा 3,104 7,973 156.9%
युटा 3,065 6,212 102.7%
नेब्रास्का 3,273 5,903 80.4%
मिसिसिपी 3,827 5,494 43.6%
वॉशिंग्टन डी.सी. 2,845 5,214 83.3%
ऱ्होड आयलंड 2,942 4,653 58.2%
न्यू मेक्सिको 3,104 4,550 46.6%
पोर्तो रिको N/A 3,523 N/A
वेस्ट व्हर्जिनिया 2,856 3,304 15.7%
हवाई 1,441 2,201 52.7%
आयडाहो 1,289 2,152 67.0%
मेन 1,021 1,959 91.9%
नॉर्थ डकोटा 822 1,543 87.7%
व्हरमॉंट 858 1,359 58.4%
अलास्का 723 1,218 68.5%
साउथ डकोटा 611 1,152 88.5%
मॉंटाना 379 618 63.1%
वायोमिंग 354 589 66.4%
एकूण 1,678,765 2,843,391 69.4%

सामाजिक व आर्थिक आकडेवारी

[संपादन]
भारत सोडून जगभर पसरलेल्या भारतीयवंशी लोकांपैकी दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक व्यक्ती अमेरिकेत राहतात

इ.स. २००६मध्ये १२,६६,२६४ व्यक्तींनी अमेरिकेत कायदेशीररीत्या स्थलांतर केले. पैकी ५८,०७२ व्यक्ती भारतातून आल्या. २००० आणि २००६ दरम्यान ४,२१,०००६ व्यक्ती भारतातून अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्यास आल्या. १९९०-१९९९ या कालखंडात ही संख्या ३,५२,२७८ होती.[१५] १९९० ते २००० या दशकात भारतातून आलेल्या व्यक्तींची संख्या १०५.८७%नी वाढली. यात कालखंडातील अमेरिकेची लोकसंख्या ७.५%नी वाढली. आशियाईवंशी अमेरिकनांपैकी भारतीयवंशीयांची संख्या १६.४% आहे. २०००साली अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयवंशीयांपैकी १०,०७,००० व्यक्ती अमेरिकेबाहेर जन्मलेल्या होत्या.

ड्यूक युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली यांच्या पाहणीनुसार १९९५ ते २००५ या दहा वर्षांत भारतीय अमेरिकनांनी स्थापन केलेल्या तांत्रिक कंपन्याची संख्या याच काळातील ब्रिटिश, चीनी, तैवानी आणि जपानी अमेरिकनांनी स्थापन केलेल्या एकूण कंपन्यांच्या संख्येपेक्षा जास्त होती.[१६] युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीच्या स्वतंत्र पाहणीनुसार सिलिकॉन व्हॅलीमधील एक तृतियांश अभियंते भारतीयवंशी आहेत तर तेथील उच्चतंत्रज्ञान कंपन्यांपैकी ७% कंपन्यांचे उच्चाधिकारी भारतीयवंशी आहेत.

आर्थिक

[संपादन]

अमेरिकेतील २०१० च्या जनगणनेनुसार तेथील वांशिक गटांपैकी भारतीय अमेरिकनांचे दरघरटी उत्पन्न सर्वाधिक होते. कार्यसक्षम भारतीय अमेरिकनांपैकी ७२.३% व्यक्ती नोकरीधंद्यात असून त्यांपैकी ५७.३% व्यक्ती व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक काम करतात.[१७] इतर अमेरिकनांतील ही टक्केवारी ३५.९% आहे.[१८] अमेरिकन असोसियेशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजन या संस्थेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारतीयवंशाचे अंदाजे ३५,००० डॉक्टर आहेत.[१९] २००२ साली भारतीयवंशी अमेरिकन २,२३,००० कंपन्याचे मालक होते व त्याद्वारे ८८ अब्ज अमेरिकन डॉलरचे उत्पन्न ६,१०,००० व्यक्तींना रोजगार मिळत होता.[२०]

२००९ सालचे मिडीयन दरघरटी उत्पन्न
वांशिकता दरघरटी उत्पन्न
भारतीय $८८,५३८[२१]
फिलिपिनो $७५,१४६[२२]
चीनी $६९,०३७[२३]
जपानी $६४,१९७[२४]
कोरियन $५३,०२५[२५]
एकूण अमेरिकेची जनता $५०,२२१

शैक्षणिक

[संपादन]

अमेरिकेतील वांशिकगटांपैकी भारतीयवंशी अमेरिकन शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमध्ये अग्रेसर आहेत.[२६] यांच्यातील ७१% व्यक्तींकडे शैक्षणिक पदव्या आहेत. अमेरिकेतील आशियाईवंशीयांत हे प्रमाण ४४% तर एकूण अमेरिकनांत हे प्रमाण २८% आहे. जवळजवळ ४०% भारतीयवंशी अमेरिकनांकडे शैक्षणिक उच्चपदव्या आहेत. एकूण अमेरिकनांपेक्षा हे प्रमाण पाचपट आहे.[२७][२८]

अमेरिकनांची शैक्षणिक पातळी: २०१०[२९]
(वय २५ किंवा अधिक वर्षे)
वांशिकता शैक्षणिक पदवी प्रमाण
भारतीय ७१.१%
चीनी ५२.४%
फिलिपिनो ४८.१%
एकूण अमेरिकन जनता २८.०%

संस्कृती

[संपादन]

धर्म

[संपादन]

अमेरिकेतील भारतीयवंशी लोकांत हिंदू (५१%), मुस्लिम (१०%), ख्रिश्चन (१८% - पैकी प्रोटेस्टंट ११%, कॅथोलिक ५%, इतर ख्रिश्चन ३%), शीख (५%), जैन (२%), बौद्ध, पारसी, ज्यू व इतर अनेक धर्मीय व्यक्ती आहेत. १०% व्यक्ती आपल्याला निधर्मी किंवा नास्तिक म्हणवतात. यांतील बहुतांश आपल्या पूर्वजांचा धर्म पाळतात. कॅलिफोर्नियात स्टॉकटन शहरात इ.स. १९१२मध्ये बांधलेला गुरुद्वारा हे पहिले भारतीय धार्मिकस्थळ होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Race Reporting for the Asian Population by Selected Categories: 2010". २०१२-०१-१७ रोजी पाहिले.
  2. ^ "Roots in the Sand - the Archives". २०१३-०२-०७ रोजी पाहिले.
  3. ^ http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_DP_DPDP1&prodType=table
  4. ^ "Census shows growth among Asian Indians".
  5. ^ "Census: Asian-Indian Population Explodes Across U.S. | Divanee - South Asian news and entertainment". 2014-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०२-०७ रोजी पाहिले.
  6. ^ http://losangeles.pointslocal.com/news/2011/05/13/losangeles/320413/indian-american-population-is-fastest-growing-minority-group Archived 2013-05-14 at the Wayback Machine. पॉइंट्सलोकल.कॉम
  7. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २०१२ सप्लिमेंटल टेबल २". 2013-05-26 रोजी पाहिले.
  8. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २०१२ सप्लिमेंटल टेबल २". 2013-05-26 रोजी पाहिले.
  9. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २०१२ सप्लिमेंटल टेबल २". २०१३-०५-२६ रोजी पाहिले.
  10. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २००९ सप्लिमेंटल टेबल २". २०१३-०५-२६ रोजी पाहिले.
  11. ^ a b "ACS DEMOGRAPHIC AND HOUSING ESTIMATES Geographies Table DP05 2011 American Community Survey 1-Year Estimates". 2013-06-05 रोजी पाहिले.
  12. ^ "U.S. Census Bureau Delivers Illinois' 2010 Census Population Totals, Including First Look at Race and Hispanic Origin Data for Legislative Redistricting". 2011-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०११-०२-२० रोजी पाहिले.
  13. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; issuu.com नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  14. ^ http://www.usindiafriendship.net/census/statepop.htm Archived 2012-11-06 at the Wayback Machine.
  15. ^ Yearbook of Immigration Statistics: Fiscal Years 1820 to 2006
  16. ^ असिसी, फ्रांसिस सी. "News & Analysis: Skilled Indian Immigrants Create Wealth for America". 2011-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१०-०७-१७ रोजी पाहिले.
  17. ^ Indian-Americans: A Story of Achievement
  18. ^ "American Factfinder". २०१२-०५-१८ रोजी पाहिले.
  19. ^ "Indian Americans in New Hampshire". 2010-04-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०१२-०३-२६ रोजी पाहिले.
  20. ^ Asian Indian Summary of Findings
  21. ^ "United States - Selected Population Profile in the United States (Asian Indian alone or in any combination)". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-30 रोजी पाहिले.
  22. ^ United States - Selected Population Profile in the United States (Filipino alone or in any combination)[permanent dead link]
  23. ^ "United States - Selected Population Profile in the United States (Chinese alone or in any combination)". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-30 रोजी पाहिले.
  24. ^ United States - Selected Population Profile in the United States (Japanese alone or in any combination)[permanent dead link]
  25. ^ United States - Selected Population Profile in the United States (Korean alone or in any combination)[permanent dead link]
  26. ^ "USA�s best: Indian Americans top community - World - IBNLive". 2009-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०२-०७ रोजी पाहिले.
  27. ^ The Indian American Centre for Political Awareness.
  28. ^ "सीआयए - द वर्ल्ड फॅक्टबूक - इंडिया". 2008-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-30 रोजी पाहिले.
  29. ^ 2008-2010 American Community Survey 3-Year Estimates