Google Play वरून अॅप इंस्टॉल करण्यापूर्वी, तुम्ही त्या अॅपचा डेटासंबंधित सुरक्षितता विभाग तपासू शकता. डेव्हलपर त्यांचे अॅप तुमचा डेटा कसा हाताळते याबद्दलची माहिती शेअर करण्यासाठी डेटासंबंधित सुरक्षितता विभाग वापरतात. या प्रकारे, कोणती अॅप्स वापरायची याबद्दल तुम्ही अधिक अभ्यासपूर्ण निर्णय घेऊ शकता.
अॅपची डेटासंबंधित सुरक्षितता माहिती शोधणे
- Google Play
उघडा.
- अॅप शोधण्यासाठी ब्राउझ करा किंवा शोध बार वापरा.
- अॅपवर टॅप करा.
- "डेटासंबंधित सुरक्षितता" या अंतर्गत तुम्हाला अॅपच्या डेटासंबंधित सुरक्षितता पद्धतींचा सारांश सापडेल.
- अधिक तपशिलांसाठी, तपशील पहा वर टॅप करा.
टीप: डेटासंबंधित सुरक्षितता विभागामधील माहिती फक्त Google Play वर वितरित केल्या जाणार्या अॅप्सना लागू होते. डेटासंबंधित सुरक्षितता विभाग तुम्हाला फक्त Android 5 आणि त्यावरील आवृत्तीवर सापडेल.
अॅप डेटासंबंधित सुरक्षितता पद्धती समजून घेणे आणि त्यांचे पुनरावलोकन करणे
अॅप सूचीचा डेटासंबंधित सुरक्षितता विभाग डेव्हलपरना त्यांची अॅप्स वेगवेगळे डेटाचे प्रकार कशी गोळा करतात, शेअर करतात आणि हाताळतात त्याचे वर्णन करू देतो. डेव्हलपर यांसाठी त्यांच्या पद्धती स्पष्ट करतात:
- डेटा संग्रह: डेव्हलपर त्यांचे अॅप गोळा करत असलेल्या वापरकर्ता डेटाचे प्रकार, हा डेटा ते कसा वापरतात आणि हा डेटा गोळा करणे पर्यायी आहे का याचे वर्णन करतात. तुमच्या डिव्हाइसवरून डेटा पुन्हा मिळवण्यासाठी डेव्हलपर त्यांचे अॅप वापरतात तेव्हा सर्वसाधारणपणे डेटा “गोळा केलेला” मानला जातो.
- काही प्रकरणांत, डेटा तुमच्या डिव्हाइसवरून तांत्रिकदृष्ट्या बाहेर गेला (उदाहरणार्थ, डेटावर फक्त अल्प काळासाठी प्रक्रिया केली जाते तेव्हा) तरीही डेव्हलपरना डेटा "गोळा केलेला" म्हणून उघड करण्याची आवश्यकता नसते. या प्रकरणांबद्दल खाली अधिक जाणून घ्या.
- डेटा शेअरिंग: डेव्हलपर त्यांचे अॅप तुमचा डेटा तृतीय पक्ष यांसोबत शेअर करते का आणि कोणत्या प्रकारचा डेटा शेअर केला जातो त्याचे वर्णन करतात. अॅपद्वारे डेटा अॅक्सेस केला जातो आणि तृतीय पक्षाकडे ट्रान्सफर केला जातो तेव्हा सर्वसाधारणपणे डेटा "शेअर केलेला" मानला जातो.
- काही प्रकरणांत, डेटा दुसर्या पक्षाकडे तांत्रिकदृष्ट्या ट्रान्सफर केला गेला (उदाहरणार्थ, अॅप डेटा कसा वापरणार आहे हे त्याने स्पष्ट केल्यानंतर तुम्ही डेटा ट्रान्सफर करण्यास संमती देता तेव्हा किंवा डेव्हलपरच्या सेवा पुरवठादारासोबत डेटा शेअर केला जातो तेव्हा) तरीही डेव्हलपरना डेटा "शेअर केलेला" म्हणून उघड करण्याची आवश्यकता नसते. या प्रकरणांबद्दल खाली अधिक जाणून घ्या.
डेव्हलपर Google Play वर वितरित केलेल्या अॅपच्या सर्व आवृत्त्यांमध्ये त्यांच्या अॅपचा एकूण डेटा संग्रह आणि शेअरिंगचे वर्णन करण्यासाठी Google Play चा डेटासंबंधित सुरक्षितता विभाग वापरतात. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे अॅपची डेटा गोपनीयता व सुरक्षेसंबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपर त्यांच्या वापरकर्त्यांसह ॲप आवृत्ती विशिष्ट माहिती शेअर करण्यासाठी ॲपच्या Google Play सूचीमधील "या ॲपबद्दल" विभाग, गोपनीयता धोरण किंवा इतर दस्तऐवज वापरू शकतात.
डेटा संग्रह आणि डेटा शेअरिंग समजून घेणे
डेटासंबंधित सुरक्षितता विभागामधील इतर माहिती
डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये नमूद केलेले डेटाचे प्रकार आणि तो गोळा करण्याचे उद्देश
डेटासंबंधित सुरक्षितता विभाग हा विशिष्ट प्रकारचा डेटा गोळा करण्याचा आणि शेअर करण्याचा उद्देश स्पष्ट करतो. हे उद्देश स्पष्ट करण्यासाठी डेव्हलपरनी सारख्याच वर्गवार्या वापरणे आवश्यक आहे जेणेकरून, तुम्हाला एकाहून अधिक अॅप्समध्ये सुसंगतपणे तुलना करता येईल. माहितीमध्ये अॅपच्या सर्व आवृत्त्या आणि विविधतांचे वर्णन असले पाहिजे.
डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये समाविष्ट असलेले डेटा प्रकार आणि उद्देश यांबद्दल अधिक जाणून घ्या.
अॅप परवानग्या आणि डेटा संग्रह नियंत्रित करणे
संवेदनशील वापरकर्ता डेटा हाताळणाऱ्या ॲप्ससाठी Google Play "पडताळणी" बॅज
महत्त्वाचे: निकषांची सूची परिपूर्ण नाही आणि बॅज प्रदर्शित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व निकषांचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करत नाही.
डेटासंबंधित सुरक्षितता विभागात त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि वापरकर्त्याच्या गोपनीयतेसंबंधित व्यवहारांबद्दल पारदर्शक असलेल्या डेव्हलपरना हायलाइट करण्यासाठी, Google Play हे "पडताळणी" बॅज सादर करत आहे. नवीन बॅज दिला गेल्यावर तो ॲपच्या तपशील पेजवर आणि शोध परिणामांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केला जातो. सध्या, हा बॅज फक्त VPN ॲप्ससाठी उपलब्ध आहे. "पडताळणी" बॅजसाठी विचार व्हावा, याकरिता ॲपने काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- Play सुरक्षितता आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे फॉलो करणे.
- मोबाईल अॅप्लिकेशन सिक्युरिटी असेसमेंट (MASA) लेव्हल २ व्हॅलिडेशन पूर्ण करणे.
- Google Play वर किमान ९० दिवस प्रकाशित करणे.
- किमान १०,००० इंस्टॉल आणि २५० परीक्षणे मिळवणे.
- संस्था हा डेव्हलपर खाते प्रकार असणे.
- Google Play ॲप्ससाठी लक्ष्यित API पातळीच्या आवश्यकता पूर्ण करणे.
- डेटासंबंधित सुरक्षितता विभागाशी संबंधित घोषणा सबमिट करणे, ज्यामध्ये पुढील गोष्टी घोषित करणे किंवा त्यांची निवड करणे समाविष्ट आहे:
- स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन
- ट्रांझिटमधील एन्क्रिप्शन