Jump to content

प्युमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्युमा
Middle Pleistocene to Recent

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: Mammalia
वर्ग: मांसभक्षक
कुळ: Felidae
जातकुळी: Puma
जीव: P. concolor
आढळप्रदेश नकाशा
आढळप्रदेश नकाशा

संदर्भ व नोंदी

[संपादन]

{vikashpedia}}

कूगर

मांसाहारी गणातील (कार्निव्होरा) मार्जार कुलातला (फेलिडी) सस्तन प्राणी. याला प्यूमा, माउंटन लायम (गिरिकेसरी पर्वतावरचा सिंह) अशीही नावे आहेत. सबंध दक्षिण व मध्य अमेरिका, उत्तर अमेरिकेचा अगदी दूरचा भाग आणि कॅनडा या प्रदेशांत हा प्राणी आढळतो.

पूर्ण वाढ झालेल्या कूगराची लांबी तीन मी.पर्यंत असते; शेपटी ९० सेंमी. लांब असते; वजन ९० किग्रॅ.पर्यंत असते; नर मादीपेक्षा मोठा असतो. याचा रंग सिंहासारखा पिंगट असतो. कान आणि शेपटीचे टोक काळे असू शकते; पोट पांढरे असते.

कूगर झाडावर चढण्यात पटाईत आहे. हा मांसाहारी असून हरणांसारख्या मोठ्या प्राणांची शिकार करतो, परंतु उंदरांसारखे लहान प्राणीही याला खायला चालतात. पाळीव जनावरांवरदेखील हा हल्ला करतो; अगदी थोड्या वेळात १०–१२ मेंढ्या किंवा बकऱ्‍या तो सहज मारतो. याला एका वेळी खायला बरेच मांस लागते.

  1. ^ Cat Specialist Group (2002). Puma concolor. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this जीव is near threatened