माधव गडकरी
Appearance
माधव गडकरी |
---|
माधव यशवंत गडकरी (२५ सप्टेंबर, इ.स. १९२८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ३१ मे , इ.स. २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.
शिक्षण
[संपादन]- बी. ए. (ऑनर्स), मुंबई विद्यापीठ
कारकीर्द
[संपादन]- १९४५-५५ : स्वतःची नियतकालिके : निर्झर, क्षितिज, निर्धार
- १९५५-६२ : दिल्लीत आकाशवाणीमध्ये नोकरी
- १९६२-६७ : मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाइम्स (मुंबई)
- १९६७-७६ : संपादक, गोमांतक (गोवा)
- १९७६-८४ : संपादक, मुंबई सकाळ
- १९८४-९१ : संपादक, लोकसत्ता मुंबई
- १९९१-९२ : मुख्य संपादक, लोकसत्ता मुंबई / पुणे / नागपूर, रविवार लोकसत्ता, सांज लोकसत्ता, साप्ताहिक लोकप्रभा
- २५ सप्टेम्बर १९९२ : लोकसत्ता प्रकाशन समूहामधून निवृत्त
- फेब्रुवारी १९९७ पर्यंत : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार दृष्टिक्षेप" ह्या सदरांद्वारे लेखन चालू ठेवले.
विदेशी प्रवास
[संपादन]- थॉम्सन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीवर इंग्लंड व युरोपचा दॉरा.
- ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लंड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक दॉरे.
- पोर्तुगालपर्यंतच्या बहुतेक युरोपियन देशांना भेटी.
- बांगला देशच्या मुक्तीनंतर कलकत्ता ते डाक्का दॉरा
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दोन निवडणुकांचे वृत्तान्त व समीक्षा
- क्यूबाला भेट दिलेल्या दोन पैकी एक संपादक
- अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर चीनला भेट देणारे एकमेव महाराष्ट्रीय पत्रकार
- जपानला दोनदा भेट. तोक्यो येथील सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे आमंत्रण मिळलेले एकमेव मराठी पत्रकार.
- अफगाणिस्थानला भेट. खान अब्दुल गफार खान ह्यांच्या बरोबर जलालाबादला वास्तव्य.
- अनेक छोट्या आशियायी देशांना भेट.
- १९९२ मध्ये तुर्कस्थानला भेट.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अष्टपैलू आचार्य अत्रे : १९९७
- असा हा गोमंतक : पहिली आवृत्ती १९७५, दुसरी आवृत्ती १९८८
- असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आवृत्ती १९६५, दुसरी आवृत्ती १९८८
- असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आवृत्ती १९६६, दुसरी आवृत्ती १९८८
- इंदिरा ते चंद्रशेखर
- एक झलक पूर्वेची : १९७९
- कुसुमाग्रज गौरव : १९८९
- क्रांतीनंतरचा क्यूबा : १९८४
- गाजलेले अग्रलेख : १९९२
- गुलमोहराची पाने : १९९९
- चिरंतनाचे प्रवासी : १९९२
- चौफेर (स्तंभलेख संग्रह) भाग १ : पहिली आवृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६
- चौफेर भाग २ : १९८८
- चौफेर भाग ३ : १९८९
- चौफेर भाग ४ : १९९६
- चॉफेर भाग ५ : १९९८
- दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह): १९८४
- दृष्टिक्षेप भाग १ : १९९५
- दृष्टिक्षेप भाग २ : १९९६
- दृष्टिक्षेप भाग ३ : १९९६
- निफाडकर गडकरी : २००१
- निर्धार ते लोकसत्ता : १९९३
- प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
- प्रतिभेचे पंख लाभलेली माणसे : २००१
- भ्रष्टाचार्य अंतुले : १९८२
- माओनंतरचा चीन : १९८१
- मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन : पहिली आवृत्ती १९६९, दुसरी आवृत्ती १९८४
- राजीव ते नरसिंहन
- शेवटचे गांधी : १९७९
- सत्ता आणि लेखणी : १९७०
- सभेत कसे बोलावे : पहिली आवृत्ती १९८४, दुसरी आवृत्ती १९८६ तिसरी आवृत्ती १९८९
- संयुक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
- साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आवृत्ती १९९४, दुसरी आवृत्ती १९९५
- सोनार बांगला : १९७२
- हेल्लो चार्ल्स् (नाटक)
पुरस्कार
[संपादन]- १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
- १९९० : पद्मश्री
- १९९१ : अनंत हरी गद्रे पुरस्कार्
- १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार
- १९९१ : लोकश्री पुरस्कार
- १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार
- १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे
- १९९५ : संवाद पुरस्कार्, पुणे
- देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी
- व्ही.एच. कुलकर्णी पुरस्कार : 'प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी' या पुस्तकासाठी
- गोवा ॲकॅडमीचा पुरस्कार : 'सोनार बाङ्ला' या पुस्तकासाठी
- मराठी साहित्य परिषद आणि दीपलक्ष्मी यांच्याकडून मिळालेला पुरस्कार : 'चौफेर भाग १' या पुस्तकासाठी
महाराष्ट्र राज्य सरकारचे लेखन पुरस्कार मिळालेली पुस्तके
[संपादन]- निर्धार ते लोकसत्ता
- माओनंतरचा चीन
- मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन
- सोनार बांग्ला
गौरव
[संपादन]माधव गडकरी यांची माहिती देणारे http://www.madhavgadkari.com हे संकेतस्थळ आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- असामान्य संपादक Archived 2016-03-11 at the Wayback Machine.
- http://www.loksatta.com/daily/20060602/vishesh03.htm Archived 2020-11-26 at the Wayback Machine.