Jump to content

आंबील ओढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबील ओढा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक ओढा आहे.

आंबील ओढ्याची सुरुवात कात्रज तलावापासून होते पेशव्यांच्या कारकिर्दीत आंबील ओढा ही पुण्याची पश्चिमेकडील सीमा समजली जाई. या ओढ्याकाठी इतिहासकाळात एक जागृत जोगेश्वरी मंदिर होते.

शहाजीराजांनी नेमणूक केलेले कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या समवेत जिजाबाईंनी पुणे परगण्याची पाहणी केली, त्या वेळेस असे दिसून आले की, कात्रजहून वाहत येणारा आंबील ओढा हा पर्वतीच्या पायथ्यावरून पुणे गावात वाहत जातो. त्याला पावसाळ्यात पूर येऊन गावात नुकसान होते. त्या वेळेस जिजाबाईंनी या ओढ्यावरती धरण बांधायला सांगितले. धरणामुळे, गावकऱ्यांना पावसाळ्यात होणारा पुराचा त्रास कमी झाला व ढोर वस्तीमध्ये कातडी कमावण्यासाठी पाणी मिळू लागले. जिजाबाईंच्या सूचनेनुसार दादोजो कोडदेवांनी ओढ्याचा प्रवाह बदलला व सध्याच्या पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या दांडेकर पुलाच्या पश्चिमेला दिसणारे एक छोटेसे धरण (बंधारा) बांधले. त्याचा आकार हा बेलाच्या पानासारखा असल्यामुळे, हे `बेल धरण` या नावाने ओळखले जाते.

आधुनिक काळात आंबील ओढ्याच्या काठी कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, पर्वती, आंबील ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत, राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर वसले आहेत.

आंबील ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस मुठा नदीला (पूर्वेकडून पश्चिमेकडे)मिळतो