Jump to content

मिट रॉम्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा १९:२१, २६ ऑगस्ट २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
मिट रॉम्नी
Mitt Romney

मॅसेच्युसेट्स राज्याचे ७०वे राज्यपाल
कार्यकाळ
२ जानेवारी इ.स. २००३ – ४ जानेवारी इ.स. २००७

जन्म १२ मार्च, १९४७ (1947-03-12) (वय: ७७)
डेट्रॉईट, मिशिगन, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
गुरुकुल स्टॅनफर्ड विद्यापीठ
हार्वर्ड विद्यापीठ
व्यवसाय उद्योगपती
धर्म मॉर्मन
सही मिट रॉम्नीयांची सही

विलार्ड मिट रॉम्नी (इंग्लिश: Willard Mitt Romney) (१२ मार्च, इ.स. १९४७ - हयात) हा एक अमेरिकन उद्योगपती व राजकारणी आहे. रॉम्नी इ.स. २००३ तो इ.स. २००७ सालांदरम्यान मॅसेच्युसेट्सराज्याचे गव्हर्नर होता. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्याने २०१२ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. परंतु ६ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आलेल्या ह्या निवडणूकीमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी रॉम्नीला पराभूत करून अध्यक्षपद राखले.

जन्म व प्राथमिक जीवन

[संपादन]

मिट रॉम्नी ह्यांचा जन्म मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात झाला. त्यांचे वडील जॉर्ज डब्ल्यू. रॉम्नी हे स्वतः एक यशस्वी उद्योगपती, राजकारणी व १९६३ ते १९६९ दरम्यान मिशिगन राज्याचे राज्यपाल होते. युटामधील ब्रिघॅम यंग विद्यापीठातील शिक्षणापूर्वी १९६६ साली मिट रॉम्नी मॉर्मन धर्माचा प्रसार करण्यासाठी ३० महिने कालावधीकरिता फ्रान्समध्ये वास्तव्यास होते.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे प्रचार संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2012-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)